सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेच्या सेटवर मृणाल दुसानीसच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन !

Mrunal Dusanis's Birthday Celebration

सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेच्या सेटवर जंगी सेलिब्रेशन झाले आणि कारण होते मृणाल दुसानीसचा बर्थडे. मालिकेच्या संपूर्ण टीमने एकत्र येऊन सेलिब्रेशन केले… सेटवर मृणालने केक कट केला शशांकने मृणाला गिफ्ट दिल. सेटवर बरीच धम्माल मस्ती केली.

मालिका सध्या रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. सिद्धार्थने अनुच्या प्रेमाखातर आता घर सोडले आहे. सिध्दार्थच्या प्रेमाची परीक्षा सुरु झाली आहे. सिध्दार्थला स्वत:च्या पायावर उभे राहायचे आहे आणि मग अनु जवळ त्याचे प्रेम व्यक्त करायचे आहे. या सगळ्या घटनांमध्ये अनु सिडची खंबीरपणे साथ देत आहे… अनु सिद्धार्थला तिच्या घरी घेऊन जाते आणि त्याला आधार देते. आता सिध्दार्थला जॉब लागला असून यानिमित्ताने अनुच्या घरी सगळे सदस्य सेलिब्रेशन करतात… सिडला गिफ्ट देखील देतात… अनु सिद्धार्थला त्याच नवीन घर देते. सिध्दार्थ घर सोडून गेला याचे कुठेतरी दुर्गाला दु:ख होत आहे. दुर्गा आणि सिध्दार्थ एकमेकांशी बोलतील ? अनु यातून कसा मार्ग काढेल ? हे नक्की बघा सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेमध्ये सोम ते शनि रात्री ९.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

 

Mrunal Dusanis's Birthday CelebrationMrunal Dusanis's Birthday CelebrationMrunal Dusanis's Birthday CelebrationMrunal Dusanis's Birthday CelebrationMrunal Dusanis's Birthday CelebrationMrunal Dusanis's Birthday Celebration