‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ कार्यक्रमाच्या परीक्षकाच्या खुर्चीत धर्मेश !

Maharashtras Best Dancer

सोनी मराठीच्या ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ कार्यक्रमाचं परीक्षण करणार ‘धर्मेश सर’

नृत्यविश्वातलं एक प्रख्यात नाव म्हणजे ‘धर्मेश सर’. आपल्या नृत्यानं धर्मेश एका रियालिटी शो मधून प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर त्यानं पुन्हा कधीच मागं वळून पाहिलं नाही. चित्रपट, डान्स शोज करत करत आज ‘धर्मेश सर’ नृत्यक्षेत्रात यशाच्या आणि प्रसिद्धीच्या उंच शिखरावर पोचला आहे. त्याच्या या यशाचं कारण विचारलं असता तो म्हणाला की, त्याच्या आयुष्यात त्यानं चान्स घेतला आणि त्याच्या डान्सला मनापासून सादर केलं म्हणून तो आज इथं आहे. अशाच सगळ्या नृत्य कलाकारांसाठी सोनी मराठी वाहिनी घेऊन आली आहे एक चान्स, ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ या कार्यक्रमातून ! या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून धर्मेश सर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

या कार्यक्रमासाठी ऑनलाईन ऑडिशन्स सुरू झाल्या असून सोनी लिव्ह या ऍपवर जाऊन इच्छुक स्पर्धकांनी आपले ऑडिशन व्हिडिओज पाठवायचे आहेत. ऑडिशन पाठवण्याची शेवटची तारीख असणार आहे ४ नोव्हेंबर २०२०. आत्ता ऑडिशन प्रक्रिया सुरू असून लवकरच निवडलेले स्पर्धक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. प्रेक्षकांमधल्या डान्सर्सना सोनी मराठी वाहिनीकडून ही सुवर्णसंधी मिळते आहे.

तर मग तुम्ही तयार आहात नं हा चान्स घ्यायला ? कारण बेस्ट नाही तोवर रेस्ट नाही. पाहा ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ ३० नोव्हेंबर पासून सोम-मंगळ, रात्री ९ वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

 

Maharashtras Best Dancer Maharashtras Best Dancer Maharashtras Best Dancer Maharashtras Best Dancer