सोनी मराठीवर १५ सप्टेंबर ला दु.१ आणि सं. ७ वाजता रंगणार पु. लं. च्या आठवणींची हास्यजत्रा

Maharashtrachi Hasyajatra 3
सोनी मराठीवर १५ सप्टेंबर ला दु.१ आणि सं. ७ वाजता रंगणार पु. लं. च्या आठवणींची हास्यजत्रा

आपल्या लाडक्या व्यक्तीमत्त्वाच्या आठवणींनी दिवस सोनेरी होतो. असंच महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. लं. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सोनी मराठीने एकपात्री आणि द्विपात्री अभिनय स्पर्धा आयोजित केली होती. यादरम्यान पुण्यात झालेला कार्यक्रम १५ सप्टेंबर दु. १ आणि सं. ७ वाजता सोनी मराठीवर पाहता येणार आहे. आपल्या शब्द कोटी करण्याच्या स्वभावातून महाराष्ट्रात हशा पिकवणाऱ्या पु. लं. ना समर्पित हा कार्यक्रम ही महाराष्ट्रभर हशा पिकवण्यासाठी सज्ज आहे. सोनी मराठीवर सादर होणाऱ्या महाराष्ट्राची हास्यजत्रातले विनोदवीर विशाखा सुभेदार, अंशुमन विचारे, समीर चौघुले इ. दिग्गज पु. लं. ची छटा रेखाटण्यात यशस्वी झाले आहेत. तर अतुल परचुरेंनी साकारलेली भाईंची भूमिका अप्रतिम साकारली आहे. त्याशिवाय दिलीप प्रभावळकरांनी सादर केलेला वाचिक अभिनय तर अरूण नलावडेंनी साकारलेली भूमिका ही या कार्यक्रमाची वैशिष्टयं आहेत.
एक सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व म्हणून पु.लं. कडे पाहिलं जातं. एक स्टेज आर्टिस्ट, कथा-पटकथा लेखक, संगीतकार, गीतकार, वादक आणि गायक अशा अनेक कलांनी ते समृध्द होते. त्यांच्या वाचन-अभिनयाच्या शैलीबरोबरच त्यांनी गायलेल्या गीतांचं सादरीकरण ही या कार्यक्रमात झालं. राहुल देशपांडे यांनी या कार्यक्रमात पु.लंच्या गाण्यांची मैफल सजवली.
तेव्हा पु. लं. च्या बहुढंगी व्यक्तिमत्त्वाने रंगतदार झालेल्या या कार्यक्रमात सहभागी व्हा १५ सप्टेंबर ला फक्त सोनी मराठीवर.