लक्ष्मी – नारायण यांचा अलौकिक विवाह सोहळा !

Lakshmi Narayan Wedding Special Episode
लक्ष्मी - नारायण यांचा अलौकिक विवाह सोहळा !

“श्री लक्ष्मीनारायण” विवाह सोहळा विशेष २ ऑगस्ट संध्या. ७ वा.

 “श्री लक्ष्मीनारायण” मालिकेमध्ये अखेर तो क्षण आला जेंव्हा सृष्टीचे पालनहार आणि जगतजननी लक्ष्मी आणि नारायण लग्नाच्या पवित्र बंधनामध्ये अडकणार आहेत… न भूतो न भविष्यति असा हा लक्ष्मीनारायणाचा विवाह सोहळा देव देवतांच्या साक्षीने पार पडणार आहे… “श्री लक्ष्मी – नारायण” यांची अद्भुत महागाथा पहिल्यांदाच कलर्स मराठीने प्रेक्षकांच्या भेटीला आणली… ज्यामध्ये प्रेक्षकांना नुकतेच समुद्रमंथन पहायला मिळाले. हे समुद्र मंथन विष्णु आणि लक्ष्मीच्या दृष्टीकोनातून प्रेक्षकांना बघायला मिळाले. नारायण आणि लक्ष्मी यांची भेट व्हावी आणि त्यांचा विवाह संपन्न होण्यासाठी समुद्रमंथन घडून येणे अत्यावश्यक होते.

लक्ष्मी नारायण यांचा विवाह विधीयुक्त पार पडणार असून यामध्ये सीमंती पूजन, गौरीहर या विधीसाठी साक्षात महादेव आणि पार्वती विष्णुलोकामध्ये अवतरणार आहेत, तर मंगलाष्टकांसाठी फुलांचा अंतरपाट, फुल- दिव्यांच्या रोषणाईमध्ये सजलेला दरबार आणि मंडप असा दिव्य सोहळा पार पडणार आहे … परंतू, या लग्नात अनेक विघ्ने येणार आहेत.. लक्ष्मी आणि नारायण यांच्या विवाहाच्या अलक्ष्मी मात्र विरोधात आहे. श्री विष्णुशी विवाह करण्याची अलक्ष्मीची असलेली इच्छा तिने व्यक्त देखील करून दाखविली होती, पण ती आता सत्यात उतरणे कठीण आहे हे समजताच अलक्ष्मीचा क्रोध अनावर झाला…  त्यामुळे लक्ष्मी नारायण यांच्या मंगलमय विवाह सोहळ्यामध्ये अलक्ष्मी कुठले विघ्न तर आणणार नाही ना ?  हे बघणे रंजक असणार आहे… तेंव्हा नक्की बघा श्री लक्ष्मी – नारायण यांचा अलौकिक विवाह सोहळा २ ऑगस्ट संध्या ७.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

 

Lakshmi Narayan Wedding Special EpisodeLakshmi Narayan Wedding Special EpisodeLakshmi Narayan Wedding Special EpisodeLakshmi Narayan Wedding Special EpisodeLakshmi Narayan Wedding Special EpisodeLakshmi Narayan Wedding Special Episode

Lakshmi Narayan Wedding Special Episode
लक्ष्मी – नारायण यांचा अलौकिक विवाह सोहळा !