Home Entertainment होऊदे व्हायरल एंटरटेनमेंट प्रस्तुत कोळीवूड एक पर्व ची थक्क करणारी गोष्ट ऐकून प्रेरित झाला महाराष्ट्र

होऊदे व्हायरल एंटरटेनमेंट प्रस्तुत कोळीवूड एक पर्व ची थक्क करणारी गोष्ट ऐकून प्रेरित झाला महाराष्ट्र

0
होऊदे व्हायरल एंटरटेनमेंट प्रस्तुत कोळीवूड एक पर्व ची थक्क करणारी गोष्ट ऐकून प्रेरित झाला महाराष्ट्र
होऊदे व्हायरल एंटरटेनमेंट प्रस्तुत कोळीवूड एक पर्व ची थक्क करणारी गोष्ट ऐकून प्रेरित झाला महाराष्ट्र

गोव्याच्या किनाऱ्यावर, इश्काची नौका, माझा पिल्लू सारख्या गाण्यांची निर्मिती करणाऱ्या आणि यूट्यूब वर मिलियन प्रेक्षक मिळवणाऱ्या प्रवीण कोळी, योगिता कोळी आणि त्यांची संपूर्ण कोळी वूड टीम सध्या होऊदे व्हायरल एंटरटेनमेंट प्रस्तुत एक पर्व कोलीवुड आरजे सोहम सोबत लाईव्ह येत आहे. काल १४ एप्रिल २०२० रोजी संध्याकाळी ७ वाजता दिग्दर्शक प्रवीण कोळी आणि गीतकार / गायिका योगिता कोळी यांनी या पर्वाची सुरुवात केली. त्यांची ८ वर्षाची मेहनत कोणताही भक्कम आधार नसताना केलेलं धाडस आणि आज कोलीवुड ने मिळवलेले यश ऐकून आरजे सोहम सोबत संपूर्ण महाराष्ट्र थक्क झाला.

एक कलाकार जेव्हा मराठी संगीतात इतिहास घडवायचं ठरवतो ती जिद्द काय घडवू शकते हे प्रवीण कोळी यांच्या बोलण्यातून महाराष्ट्राला थक्क करून गेले. आणि आज महाराष्ट्रातील प्रत्येक युवकापुढे प्रवीण कोळी हा एक आदर्श निर्माण झाला आहे.

सध्याच्या काळात प्रत्येक अभिनेता आणि अभिनेत्री लाईव्ह येत आहेत. मात्र होऊदे व्हायरल आणि आरजे सोहम यांनी एक धाडसी निर्णय घेतला आणि कोणताही मोठा कलाकार लाईव्ह न घेण्याचं ठरवलं आणि कोलीवुड एक पर्व करण्याचं ठरवलं. हा निर्णय ऐकून अनेकांनी त्यांना वेड्यात देखील काढले मात्र तो निर्णय योग्य होता हे काल संपूर्ण महाराष्ट्राने ओळखलं.

ज्या टीम ची गाणी महाराष्ट्र तासनतास ऐकतो त्या गाण्याचे शिलेदार आणि कष्टाचे हात महाराष्ट्राला बघायला मिळतं आहेत. खूप आभार आरजे सोहम आणि होऊदे व्हायरल एंटरटेनमेंट.

कोलीवुड सलाम तुमच्या निर्मितीला..!!

 

Koliwood Ek Parva With RJ Soham Presented By Houde Viral Entertainment Koliwood Ek Parva With RJ Soham Presented By Houde Viral Entertainment

Koliwood Ek Parva With RJ Soham Presented By Houde Viral Entertainment
होऊदे व्हायरल एंटरटेनमेंट प्रस्तुत कोळीवूड एक पर्व ची थक्क करणारी गोष्ट ऐकून प्रेरित झाला महाराष्ट्र