सोनी मराठी वाहिनीच्या ‘सिंगिंग स्टार’ कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार ऋता दुर्गुळे !

Hruta Durgule To Host Singing Star
लवकरच ऋता दुर्गुळे सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत - सोनी मराठी वाहिनीच्या 'सिंगिंग स्टार' कार्यक्रमाचं करणार सूत्रसंचालन !

ऋता दुर्गुळे हा मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहरा पहिल्यांदाच सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. आजपर्यंत ऋताने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, तिच्या दुर्वा आणि वैदेही या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनात एक हक्काचे स्थान निर्माण केले आहे. तिचा स्वत:चा मोठा चाहता वर्ग आहे. सोनी मराठीच्या ‘सिंगिंग स्टार’ या एका ग्रँड कार्यक्रमात ती  पहिल्यांदाच सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडताना तिला सर्व स्पर्धक आणि परीक्षक ह्यांच्याशी संवाद साधायची संधी मिळणार आहे. मालिका, नाटक आणि सिनेमा यातून अभिनय करताना दिसणारी ऋता सूत्रसंचालनाचा नवा प्रयत्न करणार आहे. तिच्यासाठीदेखील हा अनुभव नवीन असणार आहे आणि या नव्या अनुभवासाठी तीदेखील उत्सुक आहे.

‘गाणे ताऱ्यांचे, गाणे साऱ्यांचे असे’ म्हणत ऑगस्टपासून ‘सिंगिंग स्टार’ हा कार्यक्रम सुरू होणार आहे, पण या कार्यक्रमात कोण-कोण असणार आहे आणि हा कार्यक्रम काय आहे; या गोष्टी मात्र अजून गुलदस्त्यातच आहेत. ऋता दुर्गुळेच्या असण्याने या कार्यक्रमाची शोभा वाढणार आहे हे नक्की.

ऋता दुर्गुळेला  पुन्हा एकदा स्क्रीनवर बघणं ही तिच्या चाहत्यांसाठी पर्वणीच ठरणार आहे. ‘सिंगिंग स्टार’ हा कार्यक्रम ऑगस्ट महिन्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

 

Hruta Durgule To Host Singing Star
लवकरच ऋता दुर्गुळे सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत – सोनी मराठी वाहिनीच्या ‘सिंगिंग स्टार’ कार्यक्रमाचं करणार सूत्रसंचालन !