रमा करू शकेल का आपल्या सौभाग्याचं रक्षण ? स्वामिनी | कलर्स मराठी

रमा करू शकेल का आपल्या सौभाग्याचं रक्षण ? स्वामिनी | कलर्स मराठी . #Swamini #ColorsMarathi #MarathiCelebs .

Posted by MarathiCelebs.com on Wednesday, 23 September 2020

स्वामिनी मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. निरागसपणे वाड्यात बागडत, हसण्याने सार्‍यांना मोहात पाडत आणि पेशवाई संस्कारात घडत आपल्या रमाबाई मोठ्या झाल्या आणि शनिवारवाड्यात आल्या… शनिवार वाड्यातील रमाबाईंचा प्रवास तसा कठीणच… रमाबाईंच्या साथीला पार्वतीबाई, नानासाहेब आहेतच… पण गोपिकाबाईंसोबतच आता त्यांना माधवरावांचे देखील मन जिंकायचे आहे… या प्रवासामध्ये अनेक आव्हानांना त्यांना सामोरे जावे लागले आणि अजूनही जावे लागते आहे… त्यांच्यासमोर आलेल्या अनेक कठीण प्रसंगामधून आजवर रमाबाई नेहमीच बाहेर पडल्या… माधवरावांचा अबोला, गोपिकाबाईंची नाराजगी आणि आनंदीबाईंची कट कारस्थान ज्याविषयी रमाबाई अनभिज्ञ आहेत, पण कधी पार्वतीबाई तर कधी सावित्रबाईंच्या मदतीने आजवर रमाबाईंनी यातून मार्ग काढण्याचा सतत प्रयत्न केला… आणि यामध्येच आता रमाबाईंची सगळयात मोठी कसोटी लागणार आहे… माधवरावांवर अचानक हल्ला होणार असून रमाबाई माधवरावांना कश्या वाचवतील ? त्या आपल्या सौभाग्याच रक्षण कसे करतील ? हे बघणे रंजक असणार आहे… या प्रसंगानंतर रमाबाई – माधवराव यांच्यातील दुरावा मिटेल ? गोपिकाबाईंचे मन रमाबाई जिंकू शकतील ? हे लवकरच कळेल… तेंव्हा नक्की बघा स्वामिनी मालिका सोम ते शनि रात्री ८.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

 

 

माधवरावांच्या मनामध्ये असलेल्या रमाबाईबद्दलच्या भावना ते व्यक्त करू शकतील का ? या घटनेनंतर गोपिकाबाई आणि रमाबाई यांचे नाते कोणते वळण घेईल ? माधवराव रमाबाईं यांच्यात प्रेम फुलेल का ? हे जाणून घेण्यासाठी बघत रहा स्वामिनी मालिका कलर्स मराठीवर.

 

How Will Rama Save Madhavrao - Swamini How Will Rama Save Madhavrao - Swamini How Will Rama Save Madhavrao - Swamini How Will Rama Save Madhavrao - Swamini How Will Rama Save Madhavrao - Swamini