प्रवीण कोळी दिग्दर्शित “गोल्डी ची हळद” नवीन वाटेवर

Goldichi Halad
कोळी वूड ची निर्मिती "गोल्डी ची हळद" नवीन वाटेवर..

दिग्दर्शक प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांनी कोळी वूड आणि टिप्स मराठी प्रॉडक्शन मधून “गोल्डीची हळद” अल्बम साँग ची निर्मिती केली. गायिका स्नेहा महाडिक गायक केवळ वाळंज आणि दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांच्या शब्दांना आणि संगीता ला तेजस पाडावे यांनी म्युझिक चा साज चढवला आहे. अलिबाग येथे या अल्बम चे चित्रीकरण झाले असून या भव्यदिव्य सेट चे कलादिग्दर्शन सागर कोळी, पवन लोणकर यांनी केले आहे. आणि याचे छायाचित्रण मितेश तांडेल आणि संदेश कोळी यांनी केले व त्यांचे सहाय्यक गणेश दिघे, मोहित घरत, विक्रांत मुंबईकर आणि सिद्देश वाळुंज यांनी केले आता या अल्बम ला यूट्यूब वर ६ मिलियन प्रेक्षक पूर्ण झाले आहे. टिप्स मराठी यूट्यूब चॅनेल वर हे गाणे उपलब्ध आहे.
प्रसिद्ध सिने अभिनेते भाऊ कदम, जान्हवी किल्लेकर अस्मिता सुर्वे, अंकिता राऊत, नेहा सावंत, बंटी पाटील,विश्वास पाटील आणि विनू चव्हाण यांनी अभिनय केला आहे. याचे नृत्यदिग्दर्शन सचिन कांबळे यांनी केले आहे.
“होऊदे व्हायरल एंटरटेनमेंट आणि फिल्म पब्लिसिटी” या कंपनी ने आता “गोल्डी ची हळद” एका वेगळ्या लेव्हल वर नेण्याचं ठरवलं आहे. या गाण्याचे प्रमोशन प्लॅन आणि संपूर्ण पब्लिसिटी योजना पुन्हा केली जात आहे. पुढील काहीच दिवसात हे गाणं महाराष्ट्राच्या एका सुप्रिसद्ध व्यासपीठा वर दिसणार आहे.
कोळी वूड चे सर्व मेहनती कलाकार आणि तांत्रिक कलाकार या सर्वांच्या मेहनती मधून साकारलेला “गोल्डी ची हळद” होऊदे व्हायरल एंटरटेनमेंट कडून लवकरच महाराष्ट्रात टेलिव्हिजन जगतात आणि सर्वच स्तरावर आपल्याला पाहायला मिळेल.

Goldichi Halad Goldichi Halad