कोविड रुग्णांना मिळतेय हास्यथेरेपी ! महाराष्ट्राची हास्यजत्रा

Covid Patients Get Laughter Therapy Maharashtrachi Hasyajatra

अकोल्याच मा. मधुकरराव पिचड आरोग्य मंदिर (कोविड सेंटर) या कोरोना काळात रुग्णांच्या सेवेत तत्पर आहे. योग्य आणि गरजेच्या आरोग्य सेवा पुरवून रुग्णांना लवकरात लवकर बरं करण्याचा अकोल्याच्या या कोविड सेंटरचा उद्देश आहे. कोविड सेंटरमध्ये बऱ्याचदा चिंतेचं आणि नैराश्याचं वातावरण असतं. रुग्णांना मनोरंजनाचे क्षण मिळावेत आणि त्यांनी दिलखुलास हसावं यासाठी अकोल्याच्या या कोविड सेंटरने आणि तिथल्या कर्मचाऱ्यांनी एक युक्ती शोधून काढली.

या कोविड सेंटरमध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या सोनी मराठी वाहिनीवरील सर्वांच्या लाडक्या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जातंय. गेली दीड वर्षं कोरोना काळात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सगळ्यांच्या टेन्शनवरची मात्रा ठरते आहे. क्वारंटाईनच्या काळात हास्यजत्रा पाहून अनेकांना दिलासा मिळाला आणि त्यांचं मानसिक स्वास्थ्य सुधारलं, अशा आशयाचे मेसेज आणि इमेल्स टीमला मिळाले होते. कोविड सेंटरनी रुग्णांसाठी हास्यजत्रेचं प्रक्षेपण करणं, ही कलाकारांना आणि कार्यक्रमाला मिळालेली समाधानाची पोचपावती आहे.

 

Covid Patients Get Laughter Therapy Maharashtrachi Hasyajatra Covid Patients Get Laughter Therapy Maharashtrachi Hasyajatra Covid Patients Get Laughter Therapy Maharashtrachi Hasyajatra Covid Patients Get Laughter Therapy Maharashtrachi Hasyajatra Covid Patients Get Laughter Therapy Maharashtrachi Hasyajatra