बिग बॉस मराठी सिझन २ – परागची सदस्यांना काय असेल विनंती ?

Bigg Boss Marathi Parag's Request

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरु असलेल्या टिकेल तोच टिकेल या टास्कमध्ये सिंहासनावर बसलेल्या सदस्याला उठवण्यासाठी वेगळ्या वेगळ्या युक्ती करायच्या आहेत… बळाचा वापर न करता चातुर्याने त्या सदस्याला सिंहासनावरून उठवायचे आहे… रुपाली आणि पराग यांच्या मैत्रीची चर्चा सध्या घरामध्ये आणि प्रेक्षकांमध्ये चांगलीच रंगते आहे… परागला रुपाली आवडते असे त्याचे म्हणणे असले तरी देखील रुपालीने मात्र एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली आहे कि, पराग माझा चांगला मित्र आहे … टिकेल तोच टिकेल या टास्कच्या दरम्यान ज्या गोष्टी झाल्या त्यामधल्या काही गोष्टी परागला पटल्या नाही… आणि त्याने घराचा कॅप्टन शिवला सांगितले, “तुझ्या मदतीने मला सगळ्या सदस्यांना एक विनंती करायची आहे… मी सिंहासनावर बसलेला नसताना देखील माझ्याविषयी काही गोष्टी बोलल्या जात होत्या… जोपर्यंत माझ्या घरच्यांबाबत, व्यवसायबाबत बोलत आहेत तोपर्यंत ठीक आहे, पण जिथे विषय दुसऱ्या व्यक्तीचा येतो, ज्या व्यक्तीला मी इथे भेटलो, जेंव्हा आमच्या मैत्री बद्दल बोलल जातं तेंव्हा मला वाईट वाटल… माझी एकच नम्र विनंती आहे कि, तिसऱ्या व्यक्तीला यामध्ये आणू नका”… ज्याला वीणाने देखील संमती दर्शवली… हे सगळ पराग व्यक्त होत असताना रुपालीला रडू कोसळले…

आता ही गोष्ट विरोधी टीमला कशा प्रकारे पराग सांगेल ? ते कितपत त्याचे ऐकतील ? हे आज कळेलच… तेंव्हा नक्की बघा बी बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

 

Bigg Boss Marathi Parag's RequestBigg Boss Marathi Parag's Request