कोण साकारतय छोट्या आंबेडकरांची भूमिका ?

Amrut Gaikwad Dr. Babasaheb Ambedkar
'Amrut Gaikwad' Dr. Babasaheb Ambedkar

स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची गौरवगाथा… या मालिकेत बालपणीच्या आंबेडकरांची भूमिका साकारतो आहे बालकलाकार अमृत गायकवाड. छोट्या अमृतचं सध्या सगळीकडेच कौतुक होतंय. अमृत मुळचा नाशिकजवळच्या घोटी गावातला. लहानपणापासूनच त्याला अभिनयाची आवड आहे. फावल्या वेळात गाणी ऐकणं हा त्याचा आवडता छंद. मालिकेसाठी जेव्हा ऑडिशन्स सुरु होती तेव्हा अमृतला त्याबद्दल कळलं आणि त्याने थेट ऑडिशनचं ठिकाण गाठलं. त्याचा उत्साह आणि हजरजबाबीपणा भाव खाऊन गेला आणि अमृतची छोट्या आंबेडकरांच्या रोलसाठी निवड झाली.

अमृत सेटवर सर्वांचाच लाडका आहे. दिग्दर्शक अजय मयेकरांच्या सुचनांचं तो काटेकोरपणे पालन करतो. त्यामुळेच सीन अधिकाधिक खुलून येतात. मालिकेत अमृतच्या मोठ्या भावाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आनंदासोबत त्याचं नातं अधिक घट्ट आहे. आनंदाशिवाय एक क्षणही तो राहात नाही. हीच केमिस्ट्री सीनमध्येही दिसून येते. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेचं शीर्षकगीतही अमृतने तोंडपाठ केलं आहे. सेटवर सतत तो हे शीर्षकगीत गुणगुणत असतो. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. अभिनयाचं वेड असलेल्या अमृतला याच क्षेत्रात करिअर करायचं आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ ही मालिका त्याच्या आयुष्यातला मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही.

तेव्हा अमृत साकारत असलेल्या छोट्या भीमरावांची गोष्ट पाहण्यासाठी न चुकता पाहा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

 

Amrut Gaikwad Dr. Babasaheb AmbedkarAmrut Gaikwad Dr. Babasaheb AmbedkarAmrut Gaikwad Dr. Babasaheb AmbedkarAmrut Gaikwad Dr. Babasaheb AmbedkarAmrut Gaikwad Dr. Babasaheb AmbedkarAmrut Gaikwad Dr. Babasaheb Ambedkar