हर्षदा खानविलकर यांची घाडगे & सून मालिकेत होणार एन्ट्री साकारणार पोलिस ऑफिसरची भूमिका

Ghadge And Suun
हर्षदा खानविलकर यांची घाडगे & सून मालिकेत होणार एन्ट्री साकारणार पोलिस ऑफिसरची भूमिका

घाडगे सदनात नव्या संकटाची चाहूल… कारण सौदामिनी नावाच्या पात्राची एन्ट्री लवकरच  मालिकेत होणार आहे. ही भूमिका महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री हर्षदा खानविलकर साकारणार आहे. तेव्हा सौदामिनी कडकडेच्या मालिकेत येण्याने मालिका कुठल्या वेगळ्या वळणावर येईल हे बघणे रंजक असणार आहे. हर्षदा खानविलकर पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत मालिकेमध्ये दिसणार आहेत. सौदामिनी आणि घाडगे कुटुंबाचा काय संबंध आहे ? कियाराचा हा डाव तर नाही ना ? येत्या भागांमध्ये सौदामिनी घाडगेंना इंटरोगेट का करणार आहे ? सर्व घाडग्यांना सौदामिनी नजरकैदेत ठेवणार ? सौदामिनीला पुरुषांविषयी विशेष चीड आहे, त्यामुळे कियाराच्या खोट्या बोलण्यामध्ये येऊन ती अक्षय आणि घाडग्यांना जबाबदार धरणार का ? अमृता यामधून कशी मार्ग काढेल ? हे सगळ जाणून घेण्यासाठी बघा घाडगे & सून मालिका २ जून ते ९ जून या आठवड्यामध्ये रविवारीसुध्दा नेहमीच्या वेळेत रात्री ८.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.

घाडगे & सून मालिकेमध्ये सध्या संपूर्ण घाडगे कुटुंब कियाराच्या कारस्थानांनी आणि डावपेचांनी त्रस्त झाले आहे … या सगळ्यामध्ये अमृता आणि माई मार्ग काढण्याचा प्रयत्न देखील करत आहेत… परंतु प्रत्येक वेळी कियाराची खेळी मात्र सगळ्यांना भारी पडत आहे… तिचा खोटेपणा, गरोदर आहे असं सांगण, घाडगे परिवाराला तिच्या वडिलांनी ब्लॅकमेल करण, धमक्या देण. यात कियाराने अक्षयला आपण भारताच्या बाहेर जाऊ कायमचे घाडगे सदनाला सोडून असं सांगण आणि त्यामुळेच अक्षय द्विधा मनस्थिती असण अशा गोष्टी सध्या मालिकेत घडत आहेत. आणि आता अक्षय आणि कियारा घर सोडून दुबईला जाणार हे सत्य अमृता आणि घरच्यांना देखील समजले आहे… अमृता या सगळ्यामधून काय आणि कसा मार्ग काढेल हे बघणे रंजक असणार आहे. हे घडत असतानाच मालिकेमध्ये सौदामिनीच्या एन्ट्रीमुळे काय घडेल… हे नक्की बघा घाडगे & सून मालिकेमध्ये.

 

Ghadge And SuunGhadge And Suun