स्टार प्रवाहवरील ‘जिवलगा’ मालिका निर्णायक वळणावर, काय असेल विधी आणि निखिलच्या नात्याचं भविष्य?

Jeevlaga , Jivlaga
स्टार प्रवाहवरील ‘जिवलगा’ मालिका निर्णायक वळणावर, काय असेल विधी आणि निखिलच्या नात्याचं भविष्य?

‘स्टार प्रवाह’वरील ‘जिवलगा’ मालिका निर्णायक वळणावर येऊन पोहोचलीय. काव्या आणि निखिलच्या प्रेमप्रकरणाबद्दल विधीला वाटणारा संशय अखेर खरा ठरलाय. विधीसाठी ही गोष्ट नक्कीच धक्कादायक आहे. सुखी संसाराला दृष्ट लागावी अशीच काहीशी घटना विधीच्या आयुष्यात घडलीय. या कठीण प्रसंगात विधी काय निर्णय घेणार याची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. विधीप्रमाणेच काहीशी अवस्था विश्वासची आहे. काव्या आणि निखिलच्या नात्याविषयी त्याला कल्पना असली तरी आता त्याने याविरोधात ठोस पावलं उचलण्याचा निर्णय घेतलाय. काव्या आणि निखिलला त्यांच्या चुकीची जाणीव करुन देण्यासाठी विश्वास आणि काव्या काय निर्णय घेतात याची उत्कंठावर्धक गोष्ट ‘जिवलगा’ या मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळणार आहे.

स्वप्निल जोशी, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, मधुरा देशपांडे अशी तगडी स्टारकास्ट या मालिकेत आहे. तेव्हा ‘जिवलगा’ मालिकेतली ही उत्कंठावर्धक गोष्ट पाहायला विसरु नका सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

 

Jeevlaga , JivlagaJeevlaga , JivlagaJeevlaga , Jivlaga