कलर्स मराठीवर रंगणार मनोरंजनाचा रविवार … २ ते ९ जून दर रविवारी पाहा तुमच्या आवडत्या मालिका

Colors Marathi Serials
कलर्स मराठीवर रंगणार मनोरंजनाचा रविवार

प्रेक्षकांचा आनंद या सुट्टीच्या महिन्यामध्ये द्विगुणीत होणार आहे… कारण कलर्स मराठी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे मनोरंजनाची पर्वणी… २ जून ते ९ जून पर्यंत प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या मालिका रोज त्यांच्या ठरल्या वेळेत बघायला मिळणार आहे… या मालिका कुठले रंजक वळण घेतील ? मालिकेतील नायक नायिकेच्या आयुष्यांमध्ये काय घडेल? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे… श्रीलक्ष्मीनारायण, बाळूमामाच्या नावानं चांगभलं, जीव झाला येडापिसा, घाडगे & सून आणि सुखाच्या सरींनी हे मन बावरे या मालिका नक्की बघा संध्या ७.०० वाजल्यापासून रात्री ९.३० पर्यंत आणि त्यानंतर बिग बॉस मराठी सिझन २ शनि – रवी रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर…

श्रीलक्ष्मीनारायण ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली असून प्रेक्षकांच्या मनात मालिकेबद्दल कमालीची उत्सुकता आहे… मालिकेतील भव्यदिव्य सेट, मालिकेचे शीर्षकगीत, त्यांची वेशभूषा, पात्रं सगळेच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे … प्रेक्षकांना मालिकेमध्ये लक्ष्मी नारायण यांची अलौकिक महागाथा बघायला मिळत आहे … लक्ष्मीच्या जन्मापासून लक्ष्मी – नारायण एकत्र येण्या पर्यंतचा प्रवास मालिकेमध्ये दाखविण्यात येणार आहे. सध्या मालिकेमध्ये लक्ष्मी देवीचा जन्म झाला आहे. ही विलक्षण आनंदाची बातमी साक्षात ब्रम्हदेवाने समुद्रदेवांना दिली होती समुद्रदेवाच्या कुटुंबात जन्माला आलेल्या या दैवी कन्या रत्नाच नाव श्रीलक्ष्मी असे ठेवण्यात आले. याचबरोबर प्रेक्षकांना लक्ष्मी आणि अलक्ष्मीचं वैश्विक नातं हळूहळू मालिकेद्वारे उलघडत जाणार आहे. समुद्रदेवांनी लक्ष्मी आणि अलक्ष्मी दोघींना समुद्रलोक न सोडून जाण्याची आज्ञा दिली आहे… पुढे मालिकेमध्ये काय होईल ? लक्ष्मी आणि श्रीविष्णूची भेट कशी होईल ? हे नक्की बघा श्रीलक्ष्मीनारायण मालिकेमध्ये.

बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेमध्ये आता बाळूमामांचं बालपण संपून ते आता मोठ्या रुपात दिसत आहेत. दीनदुबळ्यांचा कैवार घेणारे, गरीबांचे खरेखुरे प्रतिनिधित्व करणारे संत बाळूमामा यांची ही चरित्रगाथा एका नव्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. मालिकेमध्ये बाळूमामांच्या दैवी सामर्थ्याचा नवा अध्याय सुरु झाला आहे. घरच्यांच्या वारंवार सांगण्यावरूनही बाळूमामा लग्नाला तयार होत नाहीयेत. सुंदरा यांनी देखील बाळूमामांना लग्नासाठी तयार करण्याचा प्रयत्न केला पण तरीही त्यांचा लग्नास नकार आहे… या नकारामागे नेमकं काय कारण आहे ? मालिकेमध्ये पुढे काय होईल ? बाळूमामा लग्नास तयार होतील का ? या प्रश्नांची उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.

घाडगे & सून मालिकेमध्ये आता अक्षय आणि कियारा घर सोडून दुबईला जाणार आहेत… आणि त्यामुळेच अक्षय अमृताला विनंती करतो कि, दुबईला जाण्याआधी मला तुझ्यासोबत थोडा वेळ हवा आहे. अक्षय आणि अमृता बाहेर जाणार असून या दोघांमधील खूप सुंदर क्षण यावेळेस प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. यावेळेस ते अनेक आठवणी एकमेकांना सांगणार आहेत… आणि हेच सुंदर क्षण दाखविण्यासाठी खास गाण देखील शूट करण्यात आले आहे.

जीव झाला येडापिसा मालिका देखील रंजक वळणावर येऊन पोहचणार आहे … आत्याबाईंना सिद्धीबद्दल आलेला संशय खात्री मध्ये बदलेल ? शिवा आणि सिद्धीच नातं कोणत वळण घेईल ? हे बघायला मिळणार आहे.

सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेमध्ये मागील काही दिवसांपासून बऱ्याच घटना घडत आहेत… सानवीच्या कट कारस्थानांमधून अनुला होणारा त्रास या सगळ्या गोष्टींपासून अनु अनभिज्ञ आहेत… सानवीने अनुला स्विमिंग पूल मध्ये पाडण्याचा प्रयत्न केला हे सिद्ध करण्याचा सिद्धार्थचा प्रयत्न आहे… तो cc tv फुटेज बघणार त्या आधी दुर्गा तिथे जाते आणि सिध्दार्थला ते फुटेज मिळणार नाही याची खबरदारी घेते… पण सिद्धार्थ प्रयत्न सोडत नाही. पूल वरचा एक माणूस दुर्गा आणि मॅनेजर यांचा बोलणं ऐकतो… आता हा माणूस सिद्धार्थला सत्य सांगेल का ? सिध्दार्थला ते फुटेज मिळू शकेल ? सानवीने केलेलं कारस्थान त्याला कळेल का ? आणि फुटेज मिळाल तर सिद्धार्थ पुराव्यासह सानवीला शिक्षा करेल का ? दुर्गाचा प्लॅन यशस्वी होईल का ? हे जाणून घेण्यासाठी बघा कलर्स मराठी.

 

Colors Marathi SerialsColors Marathi Serials

Colors Marathi Serials
कलर्स मराठीवर रंगणार मनोरंजनाचा रविवार

Colors Marathi SerialsColors Marathi Serials